📢 नागरिकांना आवाहन – आगामी ग्रामसभेस उपस्थित राहून आपले सूचना / अभिप्राय नोंदवावेत. 📢 पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कामामुळे दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. 📢 ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकी ३० सप्टेंबर पर्यंत भरणा करावा, अन्यथा दंड आकारला जाईल. 📢 ग्रामपंचायत रसलपूर येथे दिनांक २० सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा.

गावाविषयी माहिती

कुरुड्गाव हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ११०२ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे २  अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. ऊस या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

कुरुड्गाव  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गतभरपूर घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कुरुड्गाव गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ८ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

कुरुड्गाव गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श विकसनशील  व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते .

भौगोलिक स्थान

कुरुड्गाव हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ४ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ७१० चौ.कि.मी. असून ग्रामपंचायतीमध्ये    वार्ड आहेत. एकूण २१५ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ११०२ आहे. त्यामध्ये ५६५ पुरुष व ५३७ महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८० से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १०० से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

कुरुड्गाव  गाव द्राक्ष,सोयाबीन ,मका  व ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

Creative Graphic Designs

लोकजीवन

          कुरुड्गाव गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्‌या जातात.

         वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूर्जाना विशेष महत्त्व आहे.येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

कुरुड्गाव लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

पुरुष

स्त्रिया

एकूण

संस्कृती व परंपरा

कुरुड्गाव गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी पांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुले, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत पोगदान देतात. कुरुड्गाव  गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  • ग्रामदैवताचे मंदिर : गावातील प्रमुख देवतेचे मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी साप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

  • हनुमान मंदिर : गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.

 

  • शेती क्षेत्र व द्राक्षबागा : कुरुड्गाव  द्राक्ष व ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, द्राक्षबागा आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.

जवळची गावे

कुरुड्गाव गाव निफाड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे कुरुड्गाव शी  सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत

निफाड, कोठुरे जळगाव, काथरगाव , सुंदरपूर, पिंपळस, रसलपूर  ही कुरुड्गाव च्या आसपासची प्रमुख गावे आहेत.

गटविकास अधिकारी

गटविकास अधिकारी 

महसूल व इतर समन्वय कर्मचारी

अ.नं. नाव विभाग पद संपर्क क्रमांक
1. श्री .अमित दिगंबर उगले ग्राम महसूल अधिकारी (+91) ९०२१४ ८५४२५
2. सौ .अपर्णा मनोहर साळवे BLO (+91) ९३२५५ ४०५२५
3. सौ .केदाबाई तानाजी आहिरे पोलीस पाटील (+91) ९०७५९ १२०४०
4. श्री .योगेश पाटील सहय्यक कृषी अधिकारी (+91) ८०८७६ ७४५४७

ग्रामपंचायत इतर विभाग कर्मचारी

अ.नं. नाव विभाग पद संपर्क क्रमांक
1. श्री .तुकाराम रामदास कोठावदे ग्रामपंचायत अधिकारी (+91) ९४२६२ ५७२७९
2. सौ .अपर्णा मनोहर साळवे लिपिक / शिपाई (+91) ९३२५५ ४०५२५6
3. श्री .गोरख केदू वाघमारे पाणीपुरवठा कर्मचारी (+91) ९३७०२ ९१४९२
4. श्री .अजय कृष्णा साळवे संगणक परिचालक (+91) ९३५६७ ८४२००
5. श्री . विलास केदू वाघमारे रोजगार सेवक

ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले

जन्म नोंद दाखला

मृत्यु नोंद दाखला

विवाह नोंदणी दाखला

दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला

निराधार असल्याचा दाखला

नमुना ८ चा उतारा

उत्पन्न दाखला

जातीचा दाखला

शिक्षण विभाग

अंगणवाडी विभाग

विद्यार्थी संख्या

अंगणवाडी नाव मुले मुली एकूण
अंगणवाडी केंद्र ०१ 28 19 47
अंगणवाडी केंद्र ०२ 13 19 32
एकूण 41 38 79

अंगणवाडी सेविका माहिती

नाव अंगणवाडी नाव मोबाईल क्रमांक
सौ. वर्षा कुलभूषण सांगळे अंगणवाडी केंद्र ०१ (+91) ७०६६३ १२४१३
सौ . प्रीतम मच्छिंद्र ढेंगळे अंगणवाडी केंद्र ०२ (+91) ९३५९१ ८४३४७

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरुड्गाव

युडायस नंबर :-27201005601

विद्यार्थी संख्या

इयत्ता मुले मुली एकूण
पहिली 02 03 05
दुसरी 03 03 06
तिसरी 05 05 10
चौथी 07 04 11
एकूण 17 15 32

शिक्षक माहिती

नाव पद
श्री. अविनाश विष्णू बागडे मुख्याधापक
श्री. राजू नारायण भोये शिक्षक

आरोग्य विभाग

अ.नं. नाव आरोग्य विभाग पद संपर्क क्रमांक
1. डॉ. सुजित कोशिरे तालुका वैद्यकीय अधिकारी (+91) 94227 57565
2. डॉ .विशाखा शिंदे PHC वैद्यकीय अधिकारी (+91) ९१३०५ ४३६४७
3. डॉ .पूजा कापसे उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी (+91) ९४२०२ ५९५४२
4. सौ .दिपाली वानखेडे आरोग्य सेवक (+91) ८०८०७ ८१३६८
5. सौ. वनिता देशपांडे आरोग्य सेविका (+91) 95039 91213
6. सौ .संकल्प वाघ आरोग्य सेविका (+91) ९५५२९ ३६०७२
7. सौ .शैला ढेंगळे आशा वर्कर (+91) ९५६१७ ४६२६०

स्त्री स्वयं सहाय्यता गट

अ.नं. नाव ठिकाण
1. रेणुका महिला स्वयं सहाय्यता समूह कुरुड्गाव
2. सप्तस्रुंगी महिला स्वयं सहाय्यता समूह कुरुड्गाव
3. अन्वी महिला स्वयं सहायत्ता समूह कुरुड्गाव
4. भाग्यश्री महिला स्वयं सहायत्ता समूह कुरुड्गाव
5. भरारी महिला स्वयं सहायत्ता समूह कुरुड्गाव
6. गरुडजेप महिला स्वयं सहायत्ता समूह कुरुड्गाव
7. सम्राट महिला स्वयं सहायत्ता समूह कुरुड्गाव
8. तन्वी महिला स्वयं सहायत्ता समूह कुरुड्गाव

कृषी विभाग